पुणे: लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘ताकदवान’ भाजपमध्ये राजकीय भवितव्य आहे, असे मानून प्रवेश घेणारी मंडळी आता पर्याय चुकला का? याची तपासणी करत आहेत. तर पक्षांतराच्या चाचपणीमध्ये आपण ‘शरद पवार’ यांचे नेतृत्व स्वीकारले तर कसे, याचीही चाचपणी करू लागले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते ते राजकीय पटलावर ताकद दाखविणाऱ्या मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे केले, तर आपणही त्यात असावे असे वाटणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाची आंतरवाली सराटीमध्ये गेल्या काही दिवसापासून गर्दी झाली आहे. आतापर्यंत राज्यातून ८०० हून अधिक अर्ज आले असताना पुणे जिल्ह्यातील 30 जणांनी गुरुवारी आंतरवाली या गावी जाऊन जरांगे यांची भेट घेतली व आपण निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले.
आंतरवाली सराटी येथे झालेल्या इच्छुकांच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील इच्छुकांची नावे खालील प्रमाणे अंकुश राक्षे, विकास डोख, विजू आप्पा बराटे, शंकर राक्षे, अतुल दिघे, अरूण पापळ, वसत साळुंके, राजाभाऊ तांबे, दादासाहेब माने, अमर जगताप, गणेश दाभाडे, मनोज खांदवे, सुधीर मते, समीर पायगुडे, राकेश चव्हाण, कृष्णा कुडक, मनीष थोरात, अक्षय भगत, अजिंक्य सुतार, पंढरीनाथ खोपडे, भुषण शिर्के, अशोक बेलदरे, प्रमोद बलकवडे, सूर्यकांत सुभाष काळभोर यांच्यासह आणखी ७-८ प्रस्थापित इच्छुक आहेत. त्यांची नावे २० तारखे नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच काही प्रस्थापिताच्या कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली असल्याची माहिती मराठा सेवक अनिकेत देशमाने यांनी दिली आहे.