पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई गँगने स्वीकारली असल्याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली होती. ही पोस्ट शुभू लोणकर महाराष्ट्र या फेसबुक अकाउंटवरून करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणी शुभम लोणकरचा २८ वर्षीय भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शुभम लोणकरसह धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना या कटात सामील करून घेतलेल्या कटकारस्थानांपैकी तो एक आहे. प्रवीण लोणकरसह पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून, दोघांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
फेसबूक पोस्ट व्हायरल?
लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी स्विकारणारी फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे. शुबू लोणकर महाराष्ट्र या नावानं पोस्ट आहे. हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या या पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु झाली आहे. फेकबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास केला जातं आहे. आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांचे पथक अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील निवरी बुद्रुक गांवात लोणकर याच्या घरी पोहोचले होते. मात्र, त्याच्या घराला कुलूप होतं.
कोण आहे शुबू लोणकर?
शुभम लोणकर हा अकोल्यातील अकोट येथील रहिवासी आहे. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी त्याला शस्त्रास्त्र तस्करीच्या आरोपाखाली पुण्यातून अटक केली होती. त्याच्याकडून तीन पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याची जामिनावर सुटका झाली होती. शुभमचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्याशी संबंध असल्याचे उघड झालं आहे. लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. शुभमचे नेटवर्क दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहे.
शुबू लोणकर २०१४ पासून गावातून फरार
शुभम लोणकर याचा गत काही दिवसांपूर्वी बिश्नोई गँगशी संपर्क आल्याने अकोला व अकोट पोलिसांनी त्याच्या मूळगावात शोध घेतला. मात्र, त्याच्यासह भावाने जून २०२४ पासून गाव सोडले होते. बिष्णोई गँगशी संबंध असलेल्या शुभम लोणकर व त्याच्या भावाचा शोध घेणाऱ्या पोलिसांना ते दोघेही घरी आढळले नाहीत. त्याचे घर बंद असल्याने शेजारी विचारपूस केली असता, जून २०२४ च्या पहिल्याच आठवड्यात ते अकोट सोडून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.