पुणे: पुणे जिल्ह्यातील बोपदेवघाट तरुणीवर लैंगिक सामूहिक अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वालचंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरज उर्फ बापू गोसावीला वालचंदनगर पोलिसांनी अकलूजमधून ताब्यात घेतले आहे.
पुण्यातील बोपदेव घाटात रात्री आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका 21 वर्षीय तरुणीवर आणि तिच्या मित्रावर हल्ला करण्यात आला होता. शस्त्रासह लाकडी दांडक्यांचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असेलल्या वस्तू घेऊन तरूणाला झाडाला बांधून ठेवण्यात आले होते. तर तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला होता. या घटनेतील दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.