-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुरच्या बाबूरावनगर मधील स्वयंभू फॅब्रिकेशन व हार्डवेअरमधील कंपाउंड व गळ्यातील ड्रील मटेरियल, वजनमापे, लोखंडी बार, मशिनरी सह विविध वस्तू अशा एकूण 73 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात हनुमंत विठ्ठल भापकर (वय 42) व्यवसाय हार्डवेअर व फॅब्रिकेशन (रा. बाबुरावनगर शिरुर, जि. पुणे) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भापकर यांचे स्वंयभु हार्डवेअर फॅब्रिकेशन नावाचे दुकान आहे. 7 ऑगस्ट 2024 रोजी रात्री भापकर दुकान बंद करून घरी निघून गेले व त्यांनतर 08 ऑगस्टला सकाळी साडेनऊच्या सुमारास दुकानात आले असता दुकानात पाहणी केली. त्यावेळी त्यांना दुकानाच्या समोर असलेल्या कम्पाउड मधील मोकळ्या जागेत काही वस्तु व मशिनरी, वजनमापे, ड्रील मटेरीयल, दिसून आल्या नाहीत. त्यावेळी त्यांनी दुकानातील काम करणाऱ्या कामगाराना विचारपुस केली. तेव्हा त्यांनाही त्याबाबत माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भापकर यांनी दुकानाच्या आतील बाजूला असलेल्या गाळ्याची व मोकळ्या जागेत ठेवलेल्या वस्तूची पाहणी केली. तेव्हा त्यात ठेवलेले वस्तु व मशिनरी, वजनमापे, ड्रील मटेरीयल, दिसून आले नाही.
त्यामध्ये 12 हजार रुपये किमंतीची लोखंडी हिताची कंपनीचे कटर, साडेचार हजार रूपये किमतीचे लोखंडी 5 किलोग्रॅम वजनाचे तीन नग, 10 किलोग्रॅम वजनाचे एक नग, 20 किलोग्रॅम वजनाचे 1 नग, लोखंडी वजनमापे, 18 हजार रु किमतींचे 40 बाय 06 एम. एम. ची लोखंडी ग्रील मटेरीयल पट्ट्या 09 नग, दोन हजार रू किमतींचे एक लोखंडी झाकण, 20 किलोग्रॅम वजनाचे साडेतीन हजार रु किमतीचे 16 एम, 14 एम, 10 एम असे असलेले लोखंडी ड्रील बीट, सात हजार रू किंमतीचे खिडकीसाठी असणारे लोखंडी ब्राईड बार, 18 हजार 500 रू किंमतीचे लोखंडी व्हालपास पट्ट्या असा एकूण 73 हजार पाचशे रुपये किमंतीचा माल चोरट्याने चोरुन नेला आहे.
यासंदर्भात अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आगलावे करीत आहे.