हनुमंत चिकणे
Theur News : लोणी काळभोर, (पुणे) : विविध रंगी फुलांनी सजलेले अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथे संकष्टी चतुर्थीला श्री चिंतामणी मंदिरात सोमवारी (ता. ०२) भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे पहाटेपासूनच भाविकांची गर्दी
चंदनाचा लेप लावलेल्या स्वयंभू मुर्तीला हारतुऱ्यांची सजावट, धुप अत्तराचा दरवळत असलेला सुंगध यातून “गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया”च्या जयघोषात चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. (Theur News ) अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद तांबे यांनी दिली.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद तांबे यांनी सांगितले की, भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने तसेच पितृपक्षातील या चतुर्थीला गर्दीचा ओघ काहीसा कमी असतो. (Theur News ) परंतु सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे पहाटेपासूनच भाविकांनी चिंतामणीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
यापुढे बोलताना तांबे म्हणाले कि, “अजय आगलावे यांच्या हस्ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ‘श्रीं’ ची पूजा केली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने महापूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. (Theur News ) संकष्टी निमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल्स ग्राहकांनी गजबजले होते. दर्शन रांगा मुळे मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.”
चिंचवड देवस्थान व आगलावे बंधू यांच्या वतीने मंदिराच्या प्रांगणात मंडप घालण्यात आला होता. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात अली होती. (Theur News ) तसेच उपवासाच्या खिचडी व चिवड्याचे वाटप करण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, थेऊर परिसरात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Theur News ) ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी संतोष महाराज कांबळे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात येणार असून उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Theur News : थेऊर येथील कुंजीर पाणीपुरवठा योजेनेचे अध्यक्ष सुखराज कुंजीर यांना मातृशोक..