पुणे : नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवाजी रस्ता वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दगडूशेठ गणपती मंदिराजवळील गर्दी टाळण्यासाठी १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ५ वाजल्यापासून महत्त्वाचे रस्ते बंद राहतील याबाबत महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत.
१ जानेवारी रोजी बंद असलेले मार्ग आणि पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :
– बंद असलेले मार्ग : शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात येत आहे.
– पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक-टिळक चौक-टिळक रोडने इच्छितस्थळी जावे.
– बंद मार्ग : स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात येत आहे.
– पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने-झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
– बंद मार्ग : अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात येत आहे.
– पर्यायी मार्ग : वाहन चालकांनी बाजीराव रोडने सरळ इच्छितस्थळी जावे.
– बंद मार्ग : शिवाजी रोडने जिजामाता चौकातून गणेश रोडने दारूवाला पुलाकडे जाण्यासाठी बंद करण्यात येत आहे.
– पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा येथुन डाव्या बाजूने कुंभारवेस चौक-पवळे चौक-जुनी साततोटी पोलीस चौकी मार्गे इच्छितस्थळी जावे.
– बंद मार्ग : गणेश रोडने देवजीबाबा, जिजामाता चौकाकडे जाण्यासाठी बंद करण्यात येत आहे.
– पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगीरी चौक, दारूवाला पुल-दुधभट्टी मार्गे इच्छितस्थळी जावे.