पुणे : संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन उत्साह आणि आनंदात साजरा होत होता परंतु पुण्यातील अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये मात्र झेंडावंदन झालंच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. झेंडावंदन कॉलेजमध्ये न करता ते कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्याची कॉलेजच्या डीन शिल्पा प्रतिनिधी यांनी कबुली दिली आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय सणापासून दूर रहावं लागलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये काल बांगलादेशी घुसले अशी अफवा पसरली होती. त्यावेळ डीन शिल्पा प्रतिनिधी यांनी कोणतीही जबाबदारी काल घेतली नव्हती. मात्र आज 15 ऑगस्टच्या झेंडावंदनची तयारी नको म्हणून कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये झेंडावंदन केलं. विद्यार्थ्यांना याची कुठलीही कल्पना दिली गेली नव्हती. विद्यार्थी कॉलेजमध्ये येऊन निघून गेले. त्यामुळे झेंडावंदन न करता आल्याने मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी नाराज झाले आहेत. मेडिकल कॉलेज व कमला नेहरू हॉस्पिटल या दोन्ही संस्था वेगळ्या आहेत. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजच्या डीन शिल्पा प्रतिनिधी यांच्यावर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दहशतवादी घुसल्याची बातमी…
पुण्याच्या मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात बुधवारी 3 संशयीत दहशतवादी घुसल्याची बातमी पसरली होती. हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाने त्या तिघा संशयितांना एका खोलीत बंद केलं. पोलिस कंट्रोलरूमला या याबाबत फोन करण्यात आला. तातडीनं पोलिसांचं पथक रुग्णालयात दाखल झालं. पोलिसांनी खबरदारी म्हणून रुग्णालयातून रुग्ण आणि नातेवाईकांना बाहेर काढलं गेल होत. पोलिसांनी काल ३ संशियत लोकांचे फोटो रुग्णालय प्रशासनाला पाठवले होतेे आणि तेच ते तिघे रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. त्यामुऴे अजूनच गोंधळ उडाला होता.