पुणे – वुहानमध्ये सगळं नॉर्मल झालं आहे. सगळी दुकानं सुरु आहेत.लोकांना ये-जा करण्यासाठी बंधनं नाहीत किंवा कुठल्याही गाईडलाईन्स नाहीत. कोविडच्या केसेस काही प्रमाणात आहेत मात्र स्थिती गंभीर नाही.
वुहान हे मुंबईसारखं एक मोठं शहर आहे. वुहानमध्ये सध्या तरी कुठलीही पॅनिक स्थिती नाही. सगळी हॉटेल्स आणि दुकानं उघडी आहेत. काही लोकांनी तर मास्क घातलेला देखील दिसत नाही, असं आशिषनं सांगितलं.
चीनमध्ये कोरोनाचा कहर झाला असल्याच्या बातम्या आपण काही दिवसांपासून वाचत आहोत. मात्र चीनमधील कोरोनाचं उगमस्थान मानल्या जाणाऱ्या वुहानमध्ये परिस्थिती अत्यंत नॉर्मल असून कुठलीही पॅनिक व्हावी अशी परिस्थिती नाही, हे एका वाहिनीच्या लाईव्हमधून समोर आलं आहे.
लातूरचा असलेला एमबीबीएसचा विद्यार्थी आशिष घुमरेनं चीनमधील परिस्थिती दाखवली. आशिष घुमरे यांनी तिथल्या रस्त्यावर फिरत आशिषने स्थिती लाईव्ह दाखवली आहे.
लोक काळजी घेत आहेत, परंतु चिंताजनक स्थिती नाही. तिथल्या मॉलमध्ये मुले विदाऊट मास्क खेळत आहेत. मेडिकल शॉपमधली स्थिती देखील पॅनिक व्हावं अशी नाही.
आशिष आठ ते दहा दिवसांपूर्वी भारतातून चीनला पोहोचला. त्याच्या तीन टेस्ट झाल्याचं देखील त्यानं सांगितलं. संपूर्ण शहरभर नॉर्मल परिस्थिती असल्याचं आशिषनं सांगितलं.
वुहानमध्ये कुठंही लॉकडाऊन किंवा प्रवासावर बंधनं नाहीत.या लाईव्हमध्ये एका चीनच्या विद्यार्थ्यानं सांगितलं की, वुहानमध्ये पॅनिक व्हावं अशी स्थिती नाही. सगळं काही व्यवस्थित आहे.