दिनेश सोनवणे
दौंड – पुणे जिल्हा व राज्यातील अनेक संस्थांमधील शिक्षकांच्या पदांना बोगस मान्यता दिल्याच्या तक्रारी आढळून आलेल्या आहेत याबाबत मूळ प्रस्ताव शिक्षण विभागाच्या कार्यालयात सापडत नाही, संबधित अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकत नसल्याचे चित्र आहे तेव्हा बोगस मान्यता दिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
आमदर कुल म्हणाले, राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या प्रामुख्याने शिक्षण संस्था चालक व शिक्षक यांच्यातील वादामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांना पदोन्नती, निवृत्तीवेतन मिळेपर्यंत अनेकवेळा त्रासाला सामोरे जावे लागते ते विचारात घेता ज्या शिक्षण संस्थामध्ये अशा प्रकारचे वाद आहे त्याठिकाणी शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासक नेमावे अशी मागणी करण्यात आली आहे.