युनूस तांबोळी
शिरूर : भीर्र…भीर्र…भीर्र…झाली. घाटात जुंपत असलेला गाडा फायनल स्रमाट, घाटाचा राजाचा मान पटकावणारे…, असा आक्रोश होताच ताशा आणि डफावर सनईचा सूर जुळतो. अन बैलगाडा घाटात बैलगाडा जुंपणाऱ्याची लगबग होते. बैलगाडा इशारावर धुम ठोकून पळतो. त्यातून अनावंसर सेंकद पुकारतात. बारी झाली…म्हणत बैलगाडा शौकीन आणि मालक देखील बैलगाडा घाटात उड्या मारूनच उत्साह व्यक्त करतात. असा उत्साह शिंगाडवाडी येथील श्री नाथ म्हस्कोबाच्या यात्रेत देखील दिसून आला.
वरूडे, शिंगाडवाडी ( ता.शिरूर ) येथे महाशिवरात्री व श्रीनाथ म्हकोबा देवाच्या यात्रेनिमित्त सकाळ पासून भंडाऱ्याची उधळण करत यात्रेला सुरूवात झाली. भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. येथे देखील अशाच प्रकारे बैलगाडा शौकीनांनी गर्दी केलेली पहावयास मिळाली.
यावेळी आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी पाचुंदकर म्हणाले की, बैलगाडा शर्यतीचा नाद आता पुन्हा नवीन उत्साहात महाराष्ट्रभर सुरू झाला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अथक प्रयत्नांना हे साध्य झाले आहे.
त्याचबरोबर बैलगाडा मालक, शर्यत शौकीन आणि जनतेने सुद्धा तेवढ्याच ताकदीने ही परंपरा जपण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच गावागावात उन्हातही ही परंपरा जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बैलगाडा शौकिन उपस्थित राहून प्रतिसाद देत आहेत.
यावेळी वाघाळे सोसायटीचे चेअरमन दिलीपराव थोरात, रांजणगाव गणपतीचे ग्रामपंचायत सदस्य संदीप पाचुंदकर पाटील, गणेश लांडे, युवा उद्योजक मंदार पाचुंदकर पाटील, महेश पाचुंदकर पाटील, विजय खेडकर, दिगबंर बढ़े, पप्पू पवार अमित बत्ते उपस्थित होते.
तसेच वरूडे (शिंगाडवाडी) आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य तसेच विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, परिसरातील विविध गावचे पदाधिकारी व बैलगाडा प्रेमी आणि ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.