विजय लोखंडे
वाघोली : वाघोली परिसरात दिवंगत माणिकराव सातव पाटील यांनी खरे तर आपले जीवन समाजसेवेसाठी वाहून घेतले होते. त्यांचे सातव पाटील कुटुंब घराणे समाजात आदर्श कार्य करीत त्यांचाच वारसा जपत पुढे चालवित आहे. वाघोलीत महाआरोग्य शिबिर आयोजित करून वाघोली परिसरातील मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरातून सातव पाटील कुटुंब नागरिकांची सेवा करण्याचे चांगले काम करीत आहे. वाघोली परिसरात दिवंगत माणिकराव सातव पाटील घराण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिबिराच्या भेटी प्रसंगी सांगितले.
यावेळी आमदार अशोक पवार,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद,बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील,सरपंच वसुंधरा उबाळे, महिला नेत्या मिना सातव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे,शिवसेनेचे नेते राजेंद्र पायगुडे,अलका सोनवणे, आदी अनेक मंडळी उपस्थित होते.
वाघोलीचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ नेते दिवंगत माणिकराव सातव पाटील यांच्या प्रथम स्मृति दिनाचे औचीत्य साधत भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी, २५ तारखेला वाघोली येथे करण्यात आले होते. यामध्ये १८ हजार जणांनी लाभ घेतला. तपासणी पासून शस्त्रक्रिया पर्यंतचे सारे उपचार शिबिरातील लाभार्थ्यांना मोफत मिळणार असल्याचे सार्थक सातव पाटील यांनी सांगितले.
वाघोलीत एव्हढे मोठे महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित केल्याने अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. असा आरोग्यदायी उपक्रम दिवंगत माणिकराव सातव यांच्या स्मृती दिनानिमित्त राबविल्याबद्दल संजय सातव पाटील,सार्थक सातव पाटील कुटुंबाचे आम्ही आभार मानीत आहोत.
अशोक पवार,आमदार-शिरूर,हवेली