Chandani Chowk पुणे : मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील (Mumbai-Bengaluru highway) महत्त्वाचा ठरलेल्या चांदणी चौकातील (Chandni Chowk) उड्डाणपुलासह तेथील रस्त्यांची ९० टक्के (90 percent) कामे पूर्ण ( roads including) झाली आहेत. केवळ गर्डर आणि पर्यायी रस्त्यांच्या नियोजनाचे काम बाकी आहे. गर्डर टाकण्यापूर्वी या मार्गावरील वाहतूक काही काळ (closing traffic) बंद करण्याच्या पर्यायाची चाचपणी वाहतूक पोलिसांसह (Trafik Police) ‘एनएचएआय’ (NHAI) करीत आहे. त्यानंतर गर्डर टाकण्याचे काम केले जाईल. ही सर्व कामे पूर्ण होण्यास आणखी दीड महिन्यांचा (one and a half months) कालावधी लागेल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मंगळवारी (Tuesday) स्पष्ट केले. (Chandani Chouk)
चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बसला
चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याने येथील कामे अधिक वेगाने झाली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मे रोजी पुलाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. पण ही ‘डेडलाइन’ उलटून गेली.
याबाबत बोलताना ‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले, ‘मुंबई-बेंगळुरू महामार्गादरम्यान एनडीए चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘एनएचएआय’ने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या ठिकणी उड्डाणपूल तयार करण्यात येणार असून, पुलासाठीचे खांब उभारण्यात आले आहे. मात्र, सिमेंट काँक्रिटचे गर्डर पूर्ण तयार नाहीत. हे गर्डर टाकण्यासाठी मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्याची शक्यता आहे; परंतु सद्यस्थितीत या मार्गावरून दैनंदिन ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या पाहता त्यामुळे गर्डर टाकण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे.
मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी या मार्गावरील वाहतूक वळविण्यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास आणखी दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने नव्या उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम सुरू असून, पर्यायी बाह्यवळण रस्ते तयार करण्याचे काम वेगाने केले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Pune News : शिवभोजन थाळी बंद होण्याच्या मार्गावर ; जिल्ह्यात केवळ ३८ केंद्रे सुरू..