Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर मधील ”त्या” अपघातातील ट्रक चालकाला अटक

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 17 September 2024, 10:57

लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक ने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कैलास वडेवालेच्या समोर शनिवारी (ता.14) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात एका अठरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील ट्रक चालकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

 

सार्थक विकास बाहेती (वय 18, रा. सूर्या पार्क, गुजर वस्ती, कवडीपाट टोल नाक्याजवळ, कदमवाकवस्ती तालुका हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नजिर महंमद सय्यद (वय 40, रा.मळद ता दौंड जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मोहन दिलीप महाडीक (वय 18, रा. सूर्या पार्क, कदमवाकवस्ती ता. हवेली जि.पुणे) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियादी मोहन महाडिक व सार्थक बाहेती हे दोघेजन दुचाकीवरून लोणी स्टेशनकडे दुचाकीवरून चालले होते. सार्थक हा गाडी चालवत होता तर मोहन हा पाठीमागे बसला होता. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांची दुचाकी, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एचपी गेट समोर असलेल्या कैलास वडेवालेच्याजवळ आली असता, त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात सार्थक बाहेती हा रस्त्यावर पडल्याने त्याच्या अंगावरून ट्रक गेला. या अपघातात सार्थक हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मोहन महाडिक हा या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगाने गाडी चालवुन समोरील मोटार सायकलीला पाठीमागुन जबर ठोसर मारल्याने हा अपघात झाला आहे. त्यामुळे या अपघातात मृत्यू झालेल्या सार्थक बाहेतीच्या मृत्युस ट्रक चालक कारणीभुत ठरला आहे. अशी फिर्याद मोहन महाडिक याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार लोणी काळभोर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281,125 (अ). 125 (ब), 106(1) व मोटार वाहन कायदा कलम 184,134 (1),119/177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी ट्रक चालक नजिर सय्यद याला अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10
Next Post

दुर्दैवी ! गणेश विसर्जन मिरवणुकीत आधी केला डान्स, घरी परतल्यावर हृदयविकाराचा तीव्र झटका अन् पोलीस कर्मचाऱ्याला मृत्यूने कवटाळलं..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.