Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 April 2026, 11:10

Loni kalbhor लोणी काळभोर, ता. 22 : कदमकवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात असलेल्या महारुद्र सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या आगीने मध्यरात्री मोठा थरार निर्माण केला. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, स्थानिक तरुणांच्या प्रसंगावधानामुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. Loni kalbhor

मंगळवारी (ता. 21) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अचानक आग लागली. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही आग काही क्षणांतच भडकली आणि घरातील ज्वलनशील वस्तूंना चटकन पेट घेतल्याने आगीचा फैलाव वेगाने झाला. जळत्या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. Loni kalbhor

घटनेची माहिती मिळताच परिसरातील समीर शेंडगे, प्रज्वल गुजर, राज गुजर, जितेंद्र नांगरे आणि अभिजीत आल्हाट या तरुणांनी जीवाची पर्वा न करता तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्राथमिक साधनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत इमारतीतील इतर रहिवाशांना सतर्क केले. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांमुळे आगीचा फैलाव काही प्रमाणात रोखण्यात यश आले. Loni kalbhor

 

दरम्यान, घटनेची माहिती पुणे महापालिकेच्या हडपसर अग्निशमन केंद्राला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन अधिकारी उत्कर्ष टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली फायरमन सोमनाथ मोटे, ज्ञानेश्वर आढाळगे, मंगेश शिंदे, भास्कर घुले आणि बाबासाहेब चव्हाण यांनी शिताफीने पाण्याचा मारा करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.Loni kalbhor

या आगीत घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, घरगुती वस्तू यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आर्थिक फटका बसल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. Loni kalbhor

 

 

 

 

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14

‘माझं लग्न जमत नाही, मला आयुष्य संपवायचंय’ नैराश्यातून पुण्यातल्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 13 June 2026, 14:30

रांजणगाव एमआयडीसी मधील औषध कंपनीला २५ लाखांची खंडणीची मागणी

Saturday, 13 June 2026, 14:10

लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर…

Saturday, 13 June 2026, 14:01

उरुळी कांचन मृतदेह विटंबना प्रकरणात चूक नेमकी कोणाची? खाकीची की पांढऱ्या कोटाची?

Saturday, 13 June 2026, 13:34
Next Post
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव', कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.