Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 22 April 2026, 12:41
daund crime

Daund Police Station

दौंड, ता. 22 : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता, असा जाब विचारल्याच्या रागातून महीलेसह तिघांनी एका 65 वर्षीय शेतकऱ्याला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. सोमवारी (ता. 20) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काळेवाडी गावचे हद्दीत जमिन गट क्र 56/3 मध्ये घडली.

कल्याण तुकाराम माने, (वय 65 वर्षे, व्यवसाय-शेती. रा. हिंगणीबेर्डी माने वस्ती, ता. दौंड) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या हल्ल्यात माने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सुदाम प्रल्हाद ढवळे, प्रल्हाद कृष्णा ढवळे, वनिता सुदाम ढवळे, (सर्व रा. विठ्ठलनगर, हिंगणीबेर्डी, ता. दौंड) अशी मारहाण करणाऱ्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्याण माने हे सोमवारी सायंकाळी आपल्या काळेवाडी येथील जमिन गट क्र 56/3 मधील शेतात मशागतीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्या शेतात शेजारी राहणारे आरोपी सुदाम ढवळे, प्रल्हाद ढवळे आणि वनिता ढवळे हे त्यांना न विचारता कांद्याची साठवणूक करत असल्याचे त्यांना दिसले.

 

माने यांनी या साठवणुकीबाबत जाब विचारला असता, आरोपी सुदाम प्रल्हाद ढवळे याने चिडून जाऊन जवळच असलेला दगड उचलून कल्याण माने यांच्या डोक्यात घातला. या प्रहारामुळे माने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव सुरू झाला. त्याच वेळी आरोपी प्रल्हाद ढवळे आणि वनिता ढवळे यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली.

भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादींचा मुलगा चांगदेव माने हा मदतीला धावून आला. यावेळी आरोपींनी “पुन्हा आमच्या कामात अडथळा आणला, तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देऊन तिथून पळ काढला. मुलाने जखमी वडिलांना तातडीने दौंड पोलीस स्टेशन आणि त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात नेले. सध्या त्यांच्यावर दौंड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विनोद चव्हाण करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; 'राजेगावसारखी अवस्था करू' म्हणत दिली धमकी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.