पुणे : पुण्यातील एम्प्रेस गार्डनमधील सुमारे आठशे वर्ष जुन्या वृक्षांना आता क्यूआर बसवण्यात आले असून याची सुरुवात २६ जानेवारीला होणार आहे. तसेच या क्युआर कोडच्या माध्यमातून इथे जाणाऱ्यांना वृक्षांची शास्त्रीय माहिती आणि त्यांचा इतिहास एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
ब्रिटिश सत्ता पुण्यात स्थिरावत असताना साधारणपणे १८३० च्या आसपास एम्प्रेस गार्डनची ब्रिटिशांनी निर्मिती केली. सुरुवातीला हे गार्डन सोल्जर गार्डन म्हणून ओळखलं जायचे. पुढं याचे नाव एम्प्रेस गार्डन असे झाले.
मात्र या ठिकाणी असलेले वृक्ष या गार्डनपेक्षाही जुने आहेत. काही दोनशे वर्षं जुने, काही अडीचशे वर्षं जुने तर काही तीनशे वर्षं जुने आहेत. काही झाडं प्रचंड व्यापलेली आहेत तर वेलींनेही मोठा परिसर व्यापला आहे.
अभ्यासकांच्या मते एक वेल ही तीनशे वर्षांहून अधिक जुनी आहे. या झाडांवर आता दहा ते बारा फूट उंचीवर हे क्यू आर कोड लावण्यात आलेत. ते लावताना झाडाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
दरम्यान, 26 जानेवारीपासून इथं येणारे लोक या क्यूआर कोडची ही सुविधा वापरू शकणार आहेत . एरवी फक्त वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना ज्यामध्ये रस असतो असं या वृक्षांचं जग मोठ्या रंजक पद्धतीनं सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येणार आहे.