वाडा(पुणे) : पुण्यातील वाडा येथे रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या मारूती कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली आहे. वाडा येथे रविवार ११ फेब्रुवारीला धर्मनाथ महाराजांचा उत्सव असल्याने कान्हेवाडी ( ता. खेड ) येथील सतीष निमसे हे आपली मारूती कार ( एम एच १४ जे एम ६८४५ ) घेवून वाडा येथे उत्सवासाठी आले होते. यावेळी त्यांनी त्यांची कर रस्त्याच्या कडेला उभी केली होती. यावेळी कारने अचानक पेट घेतला. या आगीत कार पेटताना मोठे आवाज होत असल्याने परिसरात काही वेळ घबराटीचे वातावरण पसरले होते.
नेमकं काय घडलं?
सतीष निमसे हे आपली मारूती कार घेऊन उत्सवासाठी आले होते. यावेळी त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी करून यात्रा उत्सवानिमीत्त आयोजीत बैलगाडा शर्यतींचा आनंद घेत असताना अचानक उभ्या केलेल्या गाडीने पेट घेतला. आग एवढी भयानक होती की काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केलं होत. यामुळे जवळ जाण्यास कोणीही धजावत नव्हतं. दरम्यान, जवळपास कोणतीही अग्नीशामक यंत्रणा नसल्याने काही वेळातच कार पुर्णपणे जळून खाक झाली होती.
कार पेट घेत असताना छोटे स्पोटासारखे आवाज येत होते. त्यामुळे काही काळ परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र आग विझवण्यात यश न आल्याने संपूर्ण कार आगीती भस्मसात झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.