लोणी काळभोर, (पुणे) : इराण, इराक व दुबई या आखाती देशांप्रमाणे पुणे शहरालगतच्या आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) या गावातील एका शेतकऱ्यांच्या विहिरीला पिण्याच्या पाण्याबरोबर चक्क पेट्रोल-डिझेलचे झरे लागल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आला होता.
दरम्यान, एका बड्या इंधनमाफियाने इंधनाची पाईपलाईन फोडून इंधनचोरीच्या प्रकारामुळे शेतकऱ्याच्या विहिरीला इंधनाचे झरे लागल्याची करामत झाली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच आता तरडे (हवेली) येथील भारत पेट्रोलियम कंपणीच्या डेपोमधुन बाहेर पडलेल्या टँकरला डिझेल, पेट्रोलचे झरे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
‘पुणे प्राईम न्यूज’च्या वाचकांनो ही बातमी वाचुन आश्चर्यचकित झालात ना. पण, ही बातमी शंभर नव्हे, तर एक लाख टक्के खरी आहे. ही किमया खरच घडली आहे. टँकरच्या टाकीला चक्क पेट्रोल-डिझेलचे झरे लागल्याचा व्हिडीओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागले आहेत. हे कसं झाल? याच कारण काय? या सर्व गोष्टींच गौडबंगाल काय? या इंधनाच्या काळाबाजाराची मालिका उद्या मंगळवारी १६ जुलैपासून सलग तीन दिवस पंचनामा या सदरातून प्रसिद्ध करून भांडाफोड करण्यात येणार आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :