– विजय लोखंडे
वाघोली : पेरणे, बकोरी(ता. हवेली) येथील ग्रामसडक योजनेतून अधिक रक्कमेच्या निधीतून मंजूर झालेल्या पेरणे-कोळपेवाडी-बकोरी रस्त्याचे काम सुरु होऊन कोळपेवाडी परिसरात सबंधित कंत्राटदार यांनी रस्ता उकरून ठेऊन गेले. या कामास 15 दिवस झाले असून या रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात थांबविले आहे. त्यामुळे रस्त्यावरील खडी, मुरूमवर आल्याने येथून येजा करताना पेरणे व बकोरी परिसरातील ग्रामस्थांना अडचणी निर्माण होत आहे.
या कारणामुळे येथे अपघात वाढत आहेत. अशी तक्रार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपा महाराष्ट्र क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पै.संदिप भोंडवे यांनी केली. त्यानंतर काम थांबविलेल्या रस्त्याची पाहणी पेरणे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी सरपंच उषा वाळके, उपसरपंच नंदा ढवळे, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रां. पं.सदस्य अक्षय वाळके, सदस्य सुजित वाळके, माजी उपसरपंच तथा सदस्य गणेश येवले, सारिका वाळके, भानुदास कोळपे, बाळासाहेब मालव, माजी उपसरपंच सोपान गायकवाड, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दशरथ वाळके, शिवाजीराव येवले, भानुदास कोळपे, माजी उपसरपंच संग्राम हाके, संतोष कोळपे, बाळासाहेब मल्हाव, माजी उपसरपंच सोपान गायकवाड, संतोष कोळपे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गेली पंधरा दिवसापासून येथील रस्त्याचे काम बंद असल्यामुळे पेरणेचे सरपंच उषा वाळके, उपसरपंच नंदा ढवळे व आदी ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी या रस्त्याच्या कामाचे कंत्राटदार दिपक जाधव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता तेंव्हा जाधव यांनी सांगितले की, विद्यमान आमदार अशोक पवार यांनी रस्त्याचे काम थांबविण्यास सांगितले आहे. याचे पुन्हा भूमिपूजन करायचे आहे असे पवारांनी सांगितले तर त्यामुळे काम बंद केले. आमचे हात बांधले गेले असल्याचे ठेकेदार दिपक जाधव यांनी सांगितले. खोदलेला रस्ता बंद ठेवल्याने रहदारी करण्यास नागरिकांची गैरसोय होत असल्याने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हे सबंधित कंत्राटदार दिपक जाधव यांच्या विरोधात आक्रमक झाले असल्याची माहिती पेरणे गावच्या लोकनियुक्त सरपंच उषा वाळके, उपसरपंच नंदा ढवळे, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अक्षय वाळके, सुजित वाळके आदींनी माध्यमांना दिली.
या रस्त्याचे कोण कंत्राटदार काम करीत आहे. याबाबत आम्हाला कल्पना नसून कंत्राटदार याने सुरु केलेले रस्त्याचे काम न थांबविता अधिक गतीने पुढे करायला हवे. रस्त्याचे भूमिपूजन होऊन काम सुरु झाले असून पुन्हा कसे भूमिपूजन होऊ शकते. याबाबत सबंधित रस्ते बांधकाम अभियंता यांच्याशी संपर्क साधून याबाबत संपर्ण माहिती घेणार आहे.
– अशोक पवार- आमदार-शिरूर – हवेलीप्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या या रस्त्याचे भुमीपूजन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून झाले आहे. तर माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाले आहे. यासाठी संदीप भोंडवे यांच्यासह आम्ही पाठपुरावा व प्रयत्न केले असल्याने याचे श्रेय कोणी घेऊ नयेत. या रस्त्याचे थांबविलेले काम त्वरित सबंधित रस्ते बांधकाम अभियंता व कंत्राटदार यांनी अधिक गतीने सुरू करून दर्जेदार काम करावेत.
– प्रदिप कंद, संचालक-पिडीसीसी बँक तथा माजी अध्यक्ष-जि.प.पुणे