संतोष पवार

पळसदेव: जवाहर नवोदय विद्यालयात पुणे जिल्ह्यातील इयत्ता पाचवी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .पुणे जिल्ह्यातील इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थी तसेच पालक शिक्षक, मुख्याध्यापक याना कळविण्यात येते की, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
या परीक्षेच्या माध्यमातून जिल्ह्यातून ८० विद्यार्थ्यांची निवड अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेतून केली जाते. जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र शासन अंतर्गत कार्यरत असून संपूर्णतः निवासी आहे. येथे केंद्रीय माध्यमिक बोर्डाचे CBSE चे शिक्षण दिले जाते सोबतच संगणक, क्रीडा, संगीत, कला इत्यादीचे शिक्षण व सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. या विद्यालयात वह्या पुस्तके, गणवेश, बेडींग, वैयक्तिक साहित्य, मेस इत्यादी सुविधा नवोदय विद्यालय समितीच्या वतीने नियमाप्रमाणे विनामूल्य पुरवल्या जातात.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे अर्ज करताना काही नियमावलींचे पालन करावयाचे आहे
विद्यार्थी सलग ३ री ते ५ वी मध्ये शिकत असावा, जन्मतारीख 01=१-०५-२०१४ ते ३१-०७-२०१६ (दोन्ही दिवस धरून ) असावी, विद्यार्थी व पालक दोन्ही पुणे जिल्याह्याचेच रहिवासी असावे, विद्यार्थ्यांची जात प्रवर्ग प्रतवारी GEN /OBC /SC /ST ( केंद्रशासन प्रमाणे राहील ), दिव्यांग असल्यास कमीत कमी ४० % व मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र असावे, शहरी / ग्रामीण भरतांना शाळेच्या location नुसार भरावे तसेच प्रत्येक वर्षाचा विस्तृत तपशील भरावा, परीक्षेचे माध्यम व्यवस्थित भरावे. फायनल अर्ज सबमिट करतांना सर्व बाबीबरोबर असल्याची खात्री करावी, अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन मिळालेली पावती, तसेच पावती सांभाळून ठेवावी. वर्ग ५ वी मध्ये शिकणारा कोणताही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी .
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जुलै २०२५ अशी आहे. प्रवेश परीक्षा दि १३ डिसेंबर २०२५ (शनिवार) रोजी घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप जि. पुणे येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय, पिंपळे जगताप ता. शिरुर जिल्हा पुणे यांनी केले आहे .







