लोणी काळभोर : पुणे पोलीस दलात प्रतिष्ठित असलेली व १०५ वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या दि पुना डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडिट सोसायटीवर नवपरीवर्तन पॅनेलने 12-1 च्या मोठ्या फरकाने बाजी मारली आहे. तर परीवर्तन पॅनेलला १ जागेवर समाधान मानावे आहे.
दि पुना डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणे या संस्थेची २०२३-२४ ते २०२८-२९ या पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नीलम पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. या निवडणुकीत पॅनेल प्रमुख महेश गंबरे यांच्या नेतृत्वाखाली नवपरीवर्तन पॅनेलने 12-1 च्या फरकाने ही निवडणूक जिंकली आहे. तर या निवडणुकीत परीवर्तन पॅनेलला १ जागा मिळाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या संस्थेच्या माध्यमातून विविध योजना सभासदांना दिल्या जातात. त्यामध्ये कर्ज, गृह कर्ज, तारण कर्ज योजना यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या मुलांना शैक्षणिक गुणवत्ता बक्षिस योजनेंतर्गत दहावी, बारावी, पदविका व पदवीमध्ये विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले तर लॅपटॉप व टॅब दिला जातो.
नवनिर्वाचित संचालक मंडळांची नावे पुढीलप्रमाणे :
सुमित कदम, उदयकुमार काळभोर, शशिकांत नरुटे, दिनेश गडांकुश, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र मारणे, अनिल गावडे, जमीर तांबोळी, वैशाली गोडगे,आशा राठोड, आकाश फासगे, अनिल भोंग , गणपत गोरे.