पुणे : शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणाच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. अशातच पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तरुणीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे 5 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार 22 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरूणीला इन्स्टाग्राम अकाउंटवर मेसेजेस आणि खासगी व्हिडिओचे स्क्रिनशॉट पाठवून तिला खासगी व्हिडीओ लिक करण्याची भिती दाखवली जायची. तसेच ते व्हिडीओ लिक करायचे नसेल तर तिच्याकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली.
या घटनेबद्दल तरुणीने पोलीसांना माहिती दिली. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक मनोज शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस करत आहेत.