Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विचारवंत आणि साहित्यिकांच्या दुर्लक्षपणामुळे शेतकऱ्यांची दुर्दशा; श्रीपाल सबनीस यांचं मत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 24 December 2023, 18:05

पुणे / राजेंद्रकुमार शेळके : भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची संस्कृती ही शेतकऱ्यांपासून सुरू होते. देश समृद्ध करण्यामध्ये शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. साहित्य संस्कृती याचा पाया हा कृषी संस्कृतीमधून सुरू झाला असून, या वैभवशाली संस्कृतीचे जनक शेतकरी सध्या आपले जीवन हे दुर्दैवी पद्धतीने जगत आहेत. एकेकाळचा शेतकरी राजा हा सध्या वेटबिगारीने गांजला आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. याला देशातील साहित्यिक व विचारवंत कारणीभूत असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सबनीस हे बोलत होते. यावेळी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराजे पवार यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक, स्वागताध्यक्ष सुहास पाटील – जामगावकर, निमंत्रक अनिलकुमार अनुभुले, जिल्हाध्यक्ष प्रा. पंडितराव लोहोकरे, शहराध्यक्ष शाहीर रमेश खाडे, जिल्हा कार्याध्यक्ष रामप्रभू माने, ज्येष्ठ कवी देवेंद्र आवटी, कृषी तज्ञ शरदराव पाटील, ज्येष्ठ कवी माधव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. दुपारी बारा ते दोन या सत्रांमध्ये कवी संमेलन संपन्न झाले. या कवी संमेलनासाठी ८३ ग्रामीण कवींनी सहभाग घेतला होता. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी देवेंद्र औटी हे होते. त्यानंतर परिसंवादाचे आयोजन ही करण्यात आले होते. प्राध्यापक सुवर्णा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद संपन्न झाला. सायंकाळच्या सत्रांमध्ये कवी, लेखक, साहित्यिक, फुलचंद नागटिळक यांनी नटसम्राट हे एकपात्री नाटक सादर केले. या नाट्यप्रयोगानंतर संमेलनाची सांगता करण्यात आली.

 

संमेलनातील प्रमुख मुद्दे

शेतकऱ्यांना का भारतरत्न नाही?, आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला महाराष्ट्र भूषण, भारतरत्न यासारख्या प्रतिष्ठित सन्मानाने सन्मानित करण्यात आले नाही. मग हा देश कृषीप्रधान कसा? देशात ९७ टक्के कृषी संस्कृती असताना अभ्यासक्रमात मात्र तीन टक्के समावेश आहे, हे विदारक चित्र बदलणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी व्यक्त केले.

– राज्यपालांनी शेतकरी व साहित्यिकांचा विचार करावा.

– राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यामध्ये साहित्यिक व कृषी क्षेत्रामधून प्रतिनिधी निवडताना साहित्यिक शरद गोरे यांना संधी देण्यात यावी. राज्यपालांनी कॅंडिडेट निवडताना साहित्य आणि कृषी संस्कृतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे तरच साहित्यिक आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असेही सबनीस म्हणाले.

यांचा झाला सन्मान…

१९ व्या अखिल भारतीय ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये काशिनाथ भतगुणकी यांना महात्मा बसवेश्वर समाजरत्न पुरस्कार, अनुजा प्रसाद मोहिते यांना सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार, प्रा. राजश्री उत्तम रणदिवे यांना संगीत सूर्य केशवराव भोसले कलारत्न पुरस्कार. विठ्ठलवाडी येथील सहशिक्षिका सुप्रिया ताकभाते यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार, वडाचीवाडी येथील मार्तंड शेषराव जगताप यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पंजाबराव देशमुख जिल्हास्तरीय कृषीरत्न पुरस्कार, विठ्ठलवाडी येथील विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे सचिव नेताजी पांडुरंग उबाळे यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महात्मा फुले राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

कर्वेनगर परिसरात अल्पवयीन मुलासह मित्रावर कोयत्याने वार; चौघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.