पुणे : इनोव्हेशन आणि इनक्युबेशनला चालना देण्यासाठी संस्थांनी समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. संशोधन समस्या सोडवण्याच्या संशोधनाद्वारे सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उद्योग आणि शिक्षणामध्ये सहकार्याची गरज आहे. डिजिटल युगात एआय आणि एमएलची महत्त्वपूर्ण भूमिका, इंटेलिजेंट सिस्टमच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रगत संगणकीय तंत्रज्ञान विकसित करण्याची ही आवश्यकता असल्याचे त्रिभुवन विद्यापीठ, नेपाळच्या आयटी इनोव्हेशन सेंटरचे संचालक डॉ. सुबर्णा शांक्य यांनी व्यक्त केले.
जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे आणि युरोपियन अलायन्स फॉर इनोव्हेशन (EAI) च्या सहकार्याने आयोजित इंटेलिजेंट सिस्टीम्स अँड मशीन लर्निंग (ICISML 2024) वरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ही दोन दिवसीय परिषद 5 आणि 6 जानेवारी 2024 रोजी जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मॅनेजमेंट, पुणे येथे पार पडली.
दरम्यान, जनरेटिव्ह एआय, क्रिएटिव्ह एआय, चॉईस कम्प्युटिंग, गेमिंग थिअरी आणि इतर संबंधित डोमेनवरील 100 हून अधिक शोधनिबंध भारतीय आणि परदेशी प्रतिनिधींनी यावेळी सादर केले. जपानमधील टोकियो विद्यापीठातील डॉ. पराग कुलकर्णी, भारतातील युरोपियन अलायन्स फॉर इनोव्हेशनचे (ईएआय) राजदूत डॉ. सच्ची नंदन मोहंती, जीएचआरसीईएम पुणे कॅम्पसचे संचालक डॉ. आर. डी. खराडकर, डॉ. के.सी. व्होरा, प्रा. रचना साबळे, आणि प्रा. वैशाली बाविस्कर आदी उपस्थित होते.
डॉ. आर. डी. खराडकर, यांनी मशीन अनलर्निंग आणि सिंथेटिक डेटा अल्गोरिदमसह उदयोन्मुख तंत्रज्ञानावर संबोधित केले आणि संबंधित डोमेनमध्ये संशोधन सुरू ठेवण्याच्या गरजेवर भर दिला. डॉ. पराग कुलकर्णी यांनी “इंटरनॅशनल जर्नल ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग अँड नॉलेज डिस्कव्हरी या जीएच रायसोनी कॉलेजच्या संशोधन जर्नलचे कौतुक केले. जर्नलच्या 9 व्या अंकाचे प्रकाशन परिषदेत डॉ. सुवर्णा सांख्य आणि डॉ. सचि नंदन मोहंती यांच्या हस्ते करण्यात आले.
परिषदेचे संयोजक प्रा. रचना साबळे आणि प्रा. वैशाली बावीस्कर यांनी प्रस्तावना केली. प्रा. सोनाली सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. भाग्यश्री वानकर यांनी आभार व्यक्त केले. सुनील रायसोनी यांनी परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राध्यापकांचे अभिनंदन केले.