Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुळशीत दारु पिऊन पडलेल्या तरुणाचा खून; चौघांवर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 28 October 2024, 16:56

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाड्याने घेण्याकरिता खोली पहाण्यासाठी आलेल्यांना दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याने झालेल्या झटापटीत चौघांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर तब्बल पाच दिवसांनी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिश अर्जुन देडगे (वय ३१, रा. साळुंखे वस्ती, माण, ता. मुळशी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

हरी गणपत वाघमोडे (वय-३३, रा. गुजरनगर, थेरगाव), अविनाश रमेश गव्हाळे (वय २८, रा. लक्ष्मणनगर, थेरगाव), विपुल सुरेश कुंभार (वय-२७, रा. लक्ष्मणनगर, थेरगाव), संदीप कांतीलाल शेडगे (रा. सदगुरु कॉलनी, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश देडगे हा त्याच्या राहत्या घरी दारु पिऊन आला होता. त्यावेळी घरमालक यांच्या ओळखीचे आकाश बापु हेगडे यास खोली भाड्याने पाहिजे होती. ती खोली पाहण्यासाठी त्याचे चौघे मित्र त्या ठिकाणी आले होते. सतिश देडगे याची रुम खाली होणार असल्याने घरमालक यांनी त्याची खोली बघण्यासाठी हरी वाघमोडे व त्याच्या मित्रांना तेथे पाठविले होते. त्यावेळी मृत देडगे हा त्याचे खोलीत दारु पिऊन पडला होता. ते खोली बघत असताना सतिश याने हरी व त्याचे मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी त्यांनी शिव्या देऊ नकोस, खोली बघायला आलो आहे, असे सांगितले. तरीही तो शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर मारायला धावून गेला. त्यावेळी त्यांच्याशी झटापटी करु लागला. त्यांनी सतिश देडगे याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकत नसल्याने त्यांनी सर्वांनी मिळून सतिश याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच बाजूला पडलेल्या लाकडी प्लायच्या पट्टीने मारहाण केली. या मारहाणीत सतीश जाग्यावरच कोसळला.

दरम्यान मारहाणीत निपचित पडलेल्या सतीशला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच मृत्यु झाल्याचे घोषित केले. हिंजवडी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करुन तपास सुरु केला आहे. तपासामध्ये खोली पहाण्यासाठी आलेल्यांकडून हा खुन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune News : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी द्या – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे ग्रामस्थांची मागणी

Tuesday, 5 May 2026, 20:00
Crime

Yavat News : “भांडण सोडवायला गेला… तलवारीने केला हल्ला!” यवत परिसरात थरारक प्रकार 

Tuesday, 5 May 2026, 19:52

Baramati News : ‘स्वस्त गहू’च्या आमिषाने पिस्तूलाचा धाक, मारहाण करून व्यावसायिकांना लुटणारी टोळी जेरबंद, बारामती पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Tuesday, 5 May 2026, 19:42
Loni Kalbhor Crime: A hardened criminal, infamous as 'Chowpatty Raja' in the criminal world, was arrested by Unit 6 of the Crime Branch.

Fursungi News : फुरसुंगी पोलिसांची धडाकेबाज कारवाई! कोबिंग ऑपरेशनमध्ये धारदार शस्त्रासह तरुण जेरबंद

Tuesday, 5 May 2026, 19:03
Girl died as drowned in dam water jalgaon

Pune News : फुरसुंगी येथे स्विमिंग पूलमध्ये ९ वर्षाची मुलगी थोडक्यात बचावली; सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरीसह सदस्यांवर गुन्हा दाखल..!; सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरीसह सदस्यांवर गुन्हा दाखल

Tuesday, 5 May 2026, 18:38
Two people were brutally beaten up over an old dispute in Kadamwak settlement; Four people were charged and two were immediately arrested

Loni Kalbhor Police News : रात्रीच्या ‘ऑल आऊट’ मोहिमेत मोठी कारवाई! रिक्षातून फिरणारे दोघे कोयत्यांसह जेरबंद

Tuesday, 5 May 2026, 18:10
Next Post
Ratan Tata didn’t give anything to brother Noel Tata in his will because….

नोएल यांना उत्तराधिकारी पदासाठी अनुभवाची आवश्यकता; 'रतन टाटा ए लाइफ' पुस्तकात दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.