रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील तळेगाव न्हावरा नं (NH548D) रोड वर रात्री बारा एकच्या दरम्यान भीषण अपघात (Accident) झाला आहे. यावेळी तळेगाव दिशेने भरधाव वेगाने आलेल्या महिंद्रा थार (Mahindra Thar ) चालकाला माळवाडी कॉर्नरचा अंदाज आला नाही. तसेच रस्त्याला अन् ओढ्याच्या पुलाला ग्रील व सुरक्षा भिंत नसल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी महिंद्रा थार ही गाडी थेट दहा फूट ओढ्यात गेली. गाडी इतकी भरधाव वेगाने होते की गाडीचे तोंड परत विरुद्ध दिशेला झाले.
या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गाडीमधील दोन्ही व्यक्तींना गंभीर दुखापत झाली असून यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. दोन्ही व्यक्तींना नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी पाठवण्यात आले असून या सर्व घडलेल्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती किरण ढमढरे यांनी दिली
वेळोवेळी ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे स्पीडब्रेकरची व वळणाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक ग्रील व ओढ्यांवरती पुलाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक भिंतीची मागणी करूनही अद्याप संबंधित अधिकाऱ्यांकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळत नसल्याने या वाढत्या अपघातामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.