पुण्यातील (Pune) गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मागच्या 2 दिवसापासून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरशी संबंधित एकही नवीन रुग्णालयात दाखल झालेले नाही. मागच्या काही महिन्यांपासून जीबीएस या दुर्मिळ आजारचे रुग्ण पुण्यात झपाट्याने वाढत होते. या आजारामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान, पुण्यातील आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, “गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहरातून आमच्याकडे एकही जीबीएसचा रुग्ण आढळलेला नाही. ज्या काही रुग्णांची नोंद झाली आहे ते पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या भागातून आहेत.” आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 198 हून अधिक लोक जीबीएसच्या प्रादुर्भावाने बाधित झाले आहेत, त्यापैकी 33 रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील आहेत आणि किमान 15 रुग्ण शेजारच्या जिल्ह्यांतील आहेत.

अहवालानुसार, पीएमसीने या महिन्याच्या सुरुवातीपासून जीबीएसचे शून्य रुग्ण नोंदवले आहेत. 25 जण अजूनही अतिदक्षता विभागात आहेत, ज्यात 15 जण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. मृतांची संख्या १२ असून एकूण 180 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाण्यामुळे हा आजार झपाट्याने वाढत होता. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आली असून आता नव्या रुग्णांची सध्या शून्यावर आली आहे.








