पुणे : दौंड तालुक्यातील यवत येथे महिलेचा गळा दाबून खून केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु अखेर यवत पोलीसांनी या खुनामध्ये झालेल्याची वाच्यता फोडली. याबाबत पोलीस हवालदार प्रकाश कुंडलिक झेंडे यांनी फिर्याद दिली आहे.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहमद रेहान मुस्ताक (वय-19) रा. पचोर ता. भिल्लोर जि. कानपूर राज्य उत्तर प्रदेश) याने (दि.09 जुलै) रोजी रात्री साडे दहा ते आकरा च्या सुमारास यवत गावच्या हद्दीत असणा-या भवानीनगर येथे सारिका अर्जुन गायकवाड यांच्या सिमेंट पत्रा खोलीत त्याची पत्नी मणिका प्रसंथा जेना (वय 26) सध्या रा. भवानीनगर, यवत मूळ रा, ओरीसा) त्याची पत्नी हिला भांडणा-या रागातून तिचा गळा दाबून खून करण्यात आला. मात्र तिने गळफास घेतला असे भासविण्यासाठी तिचे प्रेत ओढणीने पंख्याला लटकवून ठेवण्यात आले होते.
यावेळी आरोपीने यवत पोलीस स्टेशनमध्ये जावून त्याच्या पत्नीने आत्महत्या केली असल्याची खोटी तक्रार दिली. मात्र यवत पोलीसांनी या घटनेची सखोल तपास करुन ही आत्महत्या नसून खून असल्याचे तपासात निष्पन्न केले. यवत पोलीसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली असून त्याचा पुढील तपास सुरु आहे.