राहुलकुमार अवचट
यवत : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभेचे आयोजन यवत येथील पालखी भवन येथे करण्यात आले होते. ग्रामसभेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला तर पुरुषांनी मात्र ग्रामसभेकडे पाठ फिरवली होती.
ग्रामसभेस सदस्य गैरहजर असल्याचे दिसून आले. ११ वाजता असलेली ग्रामसभा कोरम पूर्ण झाल्यानंतर १२ वाजता सरपंच समीर दोरगे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी अजेंडा वाचन केले.
आवास योजनेतील अपात्र लाभार्थी, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, १५ वित्त आयोगातील मंजूर अपूर्ण कामे पूर्ण करणे, घरपट्टी पाणी पट्टी १००% वसुली करणे विविध प्रकारचे योजना बाबत माहिती दिली.
यावेळी गोपाळ माळवदकर यांनी दिव्यांग यांना ग्रामपंचायतकडून मदत मिळत नसल्याचे सांगितले. याबाबत मार्च अखेर रक्कम देली जाईल असे समीर दोरगे यांनी सांगितले.
शीतल दोरगे यांनी सांडपाणी व स्ट्रीट लाईटची कामे जलद गतीने करावी अशी मागणी केली, सहकार नगर परिसरात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, चोभे वस्ती पुल येथे मुरूम टाकने याबाबत सरपंच समीर दोरगे यांनी लवकरच या समस्या सोडवल्या जातील अशी ग्वाही दिली. ही ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
श्री काळभैरवनाथ मंदिर समोरील रस्त्यावर व महामार्ग शेजारील सेवा रस्त्यावर अनेक लोक, व्यापारी वाहने पार्क करुन निघुन जातात. दर शुक्रवारी यवत येथे आठवडे बाजार असल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
ही समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आज झालेल्या ग्रामसभेला अनेक सदस्य गैरहजर असल्याचे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली .