मागच्या वर्षभरात भारताने अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मध्ये झालेली वाढ पहिली असेल. रस्ते असो किंवा रेल्वेज, एव्हिएशन (नागरिक विमान वाहतूक) असो किंवा इनलँड वॉटरवेज २०२२ मध्ये भारत सरकारने सर्वार्थाने या विषयांवर रेकॉर्ड तोड कामगिरी केली. पण नेमकं केलं काय हे जाणून घेऊया…
सुरुवात रस्त्यांपासून करू… महाराष्ट्रात अर्थात देशातील क्षेत्रफळाप्रमाणे तिसरं सर्वात मोठं राज्यात, आजवर केवळ एकच एक्स्प्रेस वे होता, तो म्हणजे मुंबई-पुणे महामार्ग मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या आणि महत्वाच्या शहरांना जोडण्याचे कार्य या रस्त्याने होत होते हे सर्वानाच माहिती, पण नागपूर, नाशिक किंवा संभाजीनगर यांसारख्या महत्वाच्या शहरांना जोडणारे मार्ग जलदगती प्रवासासाठी बनलेले नव्हते व यामुळे या भागातील व्यवसायांवर नक्कीच परिणाम होत होता.
पण देवेंद्र फडणवीसांनी संकल्पिलेल्या समृद्धी महामार्गामुळे, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, जालना, औरंगाबाद, नासिक, नगर, ठाणे आणि मुंबई हि महत्वाची शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत व व्यवसायाला प्रगतीला मोठा वाव मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने, राज्यातील सगळ्या ३६ जिल्ह्यांना जोडण्यासाठी ऍक्सेस कंट्रोल्ड एक्सप्रेसवेज करण्याचा प्लॅन आखला आहे.
उत्तर प्रदेश कधीकाळी खड्ड्यांचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यात आज १३ एक्सप्रेस वेज आहेत. आणि जुलै २०२२ मध्ये २९६ किलोमीटर लांबीच्या बुंदेलखंड एक्सप्रेसवेचे लोकार्पण याचा आढावा या लेखातून ओघवत्या स्वरूपात घेऊयात…
रेल्वेज –
– अस्वच्छता, ट्रेन वेळेवर न पोहोचणे अश्या विविधकारणांमुळे, भारतीय रेल्वे काही वर्षापूर्वी डबघाईला आली होती. पण पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरेश प्रभू, पियुष गोयल आणि आत्ता अश्विनी वैष्णव जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे चा चेहरा मोहरा बदलून गेला. आधी रेल्वे संबंधित बऱ्याच गोष्टी आयात केल्या जायच्या. पण तसे या वर्षी घडले नाही. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत, भारतीय रेल्वे ने ३० डिसेंबर २०२२ ला २०२२ मधली सातवी हायस्पीड आणि अत्याधुनिक रेल्वे, वंदेभरात रेल्वेच लोकार्पण केले.
‘कवच’ नावाची अँटी-कॉलिजन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, ज्याच्यामुळे रेल्वे रुळावर पुढे काही अडथळा आला तर आपोआप ब्रेक्स लागून अपघात टाळता येणार आहे.मालवाहतुकीसाठी एक संपूर्ण समर्पित कॉरिडॉर ला या वर्षी गती मिळाली आहे. एकूण १६१० कि.मी लांबीचा रूट २८४३ कि.मी लांबीच्या रूट मधील आजवर पूर्ण झाला आहे. उवारीत रूट २०२३ च्या शेवटपर्यात होईल असे दिसत आहे.
रोपवेज –
– पर्वतमाला या रोपवे योजेनला जबरदस्त प्रतिसाद २०२२ मध्ये मिळाला. या योजनेच्या अंतर्गत २५६ ठिकाणी विविध महत्वाच्या ठिकाणी रोपवे चे काम सुरु आहे. शिमला, गुजरात, उतराखंड मधील अनेक शहरे, मध्यप्रदेश (उज्जैन) अश्या विविध ठिकाणी २०२२ मध्ये रोपवे प्रकल्पाचा शिलान्यास करण्यात आला, ज्याची पूर्तता २०२३ मध्ये दिसण्याची शक्यता आहे.
सिव्हिल एव्हिएशन –
– श्री रामी इंटरनॅशनल एअरपोर्ट, अयोध्याचा शिलान्यास २०२२ मध्ये झाला आणि २०२३ मध्ये ते पूर्ण होईल. या एअरपोर्टमुळे पुढे होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या जवळील टूरिजम वाढेल. वेगाने चालू असलेले डिजिटायजेशन त्यात आणखीन एक भर म्हणजे डीजी यात्रा. एअरपोर्ट वर तिकीट चेकिंग साठी लागणारी रांग या फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजी मुळे कमी होईल. डिसेंबर २०२२ मध्ये या प्रकल्पाचे उदघाटन दिल्ली, बंगलोर आणि वाराणसी विमानतळावर करण्यात आले.
मेट्रो रेल –
– शहरांची वाढत असलेली लोकसंख्या आणि त्यासोबत वाढत असलेल्या गाड्या यावर एकमेव उपाय म्हणजे सुनियोजित पब्लिक ट्रान्सपोर्ट. २०२२ मध्ये पुणे मेट्रो ची एक फेज, अहमदाबाद ची एक फेज आणि नागपूर मेट्रो ‘ची एक फेजचे लोकार्पण करण्यात आले. भारतातील सर्वात पहिली अंडरवॉटर मेट्रो, २०२३ मध्ये साकार होईल. २०२३ मध्ये देशातील पहिली रॅपिड रेल्वे सत्यात उतरणार आहे, याचाही शिलान्यास २०२२ मध्ये करण्यात आला….
इन्फ्रास्ट्रक्चर वर केंद्र सरकारचे विशेष लक्ष आहे हे वेळोवेळी सिद्ध झालंच आहे. २०२२ मध्ये घडलेले आमूलाग्र बदलांपैकी मोजकेच वर नमूद केले. आपल्या समोर असलेल्या ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी साठी, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट अत्यंत महत्त्वाची आहे.
२०२३ मध्ये कोणत्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांकडे पाहणे गरजेचे आहे या विषयी लवकरच लिहीन…!
लेखांकन : मल्हार पांडे, लोणी काळभोर (ता. हवेली, जि. पुणे)