भिगवण, (पुणे) : इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथे एकाच वेळी सुख आणि दुःखाची घटना घडली आहे. रविवारी मुलाचे थाटामाटात लग्न पार पडले, आणि दुसऱ्या दिवशी बापाने हे जग सोडले. या घटनेने भिगवण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निरगुडे गावात रविवारी (दि. १४) सकाळी आपल्या आप्तेष्टांच्या घरी तसेच नातेवाइकांच्या घरी जाऊन ‘लग्राला चला,’ असा निरोप देणारा बाप सर्वांनीच पाहिला.
लग्नात हितचिंतक, मित्रपरिवार आणि नातेवाइकांची सरबराई करतानाही त्यांना सर्वांनी पाहिले. लागण झाले, पाहुणे घरी परतले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. १५) मात्र, हृदयविकाराचा तीव्र झटक्यात बापाने जगाचा निरोप घेतला. हनुमंत आत्माराम काजळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
हनुमंत काजळे हे मूळचे इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील, मात्र, गेल्या पंचवीस-तीस वर्षापासून मदनवाडी येथे राहत होते. ते पुणे जिल्हा बँकेचे राजेगाव येथील शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. रविवारी त्यांच्या मुलाचा विवाह थाटामाटात पार पडला. सोमवारी काजळे हे आपल्या कुटुंबासाठी बारामती येथे बुक केलेली नवीन कार आणण्यासाठी निघाले होते, पण त्यापूर्वीच त्यांचं निधन झाले.
दरम्यान, काजळे हे जिल्हा सहकारी बँकेच्या दौड तालुक्यातील राजेगाव शाखेत शाखाधिकारी महणून निवृत्त झाले. त्यांच्या कामाची पद्धत व त्यांचा कामाचा अहवाल पाहून पुणे जिल्हा बँकेने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती. जिल्ह्यात भोर, दौड, बारामती, इंदापूर या तालुक्यांतील अनेक शाखेत त्यांनी सेवा बजावली आहे.