पुणे : पुणे शहरातील थंडीचा कडाका आता कमी होताना दिसत आहे. १० अंशांखाली घसरलेले किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअसदरम्यान वादात चालले आहे. यामुळे शहरातील गारठा कमी होत आहे. रविवारी २८ जानेवारीला किमान तापमानात अंशतः वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. शहरात काही दिवस किमान तापमान ८ ते १० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. मात्र, शुक्रवारपासून थंडी काहीशी कमी झाली असून, किमान तापमानात अंशतः वाढ झाली आहे. शनिवारी (ता. २७) शहरातील किमान तापमान १२.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात थंडी नीचांकी ३.१ अंश सेल्सिअस तापमान किमान तापमान ४ ते ६ अंश तर ८ अंशांदरम्यान आहे. उत्तर भारतात कायम आहे. त्याचा परिणाम अजूनही उत्तर महाराष्ट्रात जाणवेल. पुण्याला यातून थोडासा दिलासा मिळणार आहे. शनिवारी हरियानातील हिसार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नोंदले गेले. पंजाब, उत्तराखंडात हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानात किमान तापमान सहा ते धुके व थंडीची लाट अजूनही कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.