पुणे : पुण्यात सद्या जोरदार पाउस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरीकांच्या घरात पाणी शिरलं असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश ठिकाणी पाण्याची पातळी वाढत असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. पुण्यातील सिंहगड परिसरातील निंबजनगर भागामध्ये काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य समोर आले आहे. अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. गाडीच्या काचा फोडून त्या नागरिकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
गाडीची काच फोडून काढलं
पाण्याचा प्रवाह वाढल्याने अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक अडकून पडले होते. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. गाडीच्या काचा फोडून त्या नागरिकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. रस्त्यावर, सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. लहान मुले, महिला, नागरिकांनी त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात येत आहे.
खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग..
खडकवासला धरण भागात मुसळधार पाउस पडत असल्यामुळे खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सोडवा लागला. त्यामुळे मुठा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाळी आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पुण्यातील एकता नगर परिसरात छातीपर्यंत पाणी साचलं आहे. पुण्यात एकता नगर परिसरात बोटीद्वारे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. घरत पाणी शिरून बरच नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. परिसरात पाण्याची पातळी वाढत चालली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोटीद्वारे बचावकार्य करण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले आहेत. शेकडो लोक एकता नगर भागात अडकले आहेत. अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठीचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.