-प्रदिप रासकर
निमगाव भोगी : शिरुर शहरातील सर्वात जुन्या असलेल्या राम मंदिरात मांसाहाराचे तुकडे आढळल्याने हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ आज शिरूर शहर बंद ठेवण्याचे आव्हान शिरुर शहरातील हिंदु संघटनांनी केले होते. त्यास शहरातील नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. दुपारनंतर आमदार ज्ञानेश्वर कटके व माजी आमदार अशोक पवार व पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर ट्रस्टी व सकल हिंदू समाजाच्या नागरिकांच्या चर्चानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शिरूर शहरात अनेक वर्षे जुन्या राम मंदिरातील बांधकामही अनेक दिवसांपासून रखडले. हे बांधकाम व्हावे अशी मागणी बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, लहुजी शक्ती सेना व हिंदू धर्मांच्या नागरिकांनी केली.
शिरुर शहरातील प्रसिद्ध असलेल्या राम मंदिरामध्ये अज्ञात व्यक्तींनी मंदिर आवारात चिकन आणि मटन पार्टी केलेले आढळले आहे. या मुळे हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या असुन श्रीराम मंदिरात कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने व मंदिराची दुरवस्था असल्याने हा प्रकार घडला. या गोष्टीला श्रीराम मंदिर ट्रस्ट जबाबदार आहे. तरी संबंधित मंदिरात मांसाहार करणाऱ्यांवर तसेच मंदिराची व्यवस्थित देखभाल न करणाऱ्या ट्रस्टीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात शहरात हिंदू धर्म नागरिक व संघटनांचे कार्यकर्ते जमू लागले होते. त्यामुळे शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी या संघटनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आपले व्यवहार बंद ठेवून आजच्या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
आज दुपारनंतर शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी आमदार अशोक पवार, शिरूर उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे, घोडगंगाची संचालक दादा पाटील फराटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, आबासाहेब सरोदे, बजरंग दलाची शहराध्यक्ष अजिंक्य तारू, नितीन अवचार, बजरंग सेना उमेश शेळके, रवींद्र बैनाडे, श्रीराम मंदिर ट्रस्ट राजेंद्र क्षीरसागर, यांच्याशी चर्चा करून लवकरच सर्वांची एक संयुक्त बैठक घेऊन मंदिर बांधकाम व मंदिर सुरक्षा बाबत योग्य ती काळजी घ्यावी. अशा सूचना देऊन मंदिराचे काम कसे लवकर सुरू होईल यासाठी सर्वांनी मिळून एकत्र येऊन प्रयत्न करणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले. अशा घटना पुन्हा होऊ नये त्यासाठी मंदिर ट्रस्टी यांनी या परिसरात लक्ष देण्याचे सूचना यावेळी त्यांना देण्यात आल्या. तर संपूर्ण शिरूर परिसरात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठवण्यात आला होता.
तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांनी या परिसराची पाहणी केली. ही घटना निंदनीय असून या घटनेचा सखोल तपास करावा. अशा सूचना देऊन मंदिर ट्रस्ट यांनी मंदिराबाबत गंभीरता घेऊन मंदिराची सुरक्षा व सौंदर्य जपण्यासाठी प्रयत्न करावे. लवकरात लवकर मंदिरात जीर्णोद्धार करावा, त्यासाठी मदत करण्याची आश्वासनही देण्यात आले.
-ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, आमदार-शिरूरशिरूर येथील राम मंदिर हे खूप जुने मंदिर आहे. या मंदिराबाबत नागरिकांच्या भावना जोडलेले आहेत. शिरूर शहर जातीय सलोखा जपणारे शहर आहे. या शहरात अशा प्रकारे घटना घडले हे निषेधार्थ आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. तर या मंदिराचे बांधकाम व सुरक्षा यासाठी ट्रस्टींनी येणाऱ्या अडचणी सोडवून लवकरात लवकर ही कामे सुरू करावी.
-अॅड. अशोक पवार- माजी आमदारशिरूर शहरातील सर्व मंदिरे व पोलीस तहसीलदार यांची बैठक घेऊन सर्वच मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे व सरक्षा रक्षक नेमावे. यासाठी सूचना देण्यात येणार असून, राम मंदिर ट्रस्टी यांना मंदिराचे काम करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडून लवकरात लवकर काम करावे, यासाठी सूचनाही देण्यात आले आहे.
-प्रशांत ढोले, शिरूर- उपविभागीय पोलीस अधिकारीयावेळी श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने या भागात कॅमेरे लावून लवकरात लवकर या मंदिराची दुरुस्ती व सुरक्षा भिंतीचे काम करणार असल्याचे सांगितले. तर एक सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
-सिद्धेश्वर बगाडे, अध्यक्ष, श्री राम मंदिर ट्रस्ट.शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व आंदोलन व मंदिर ट्रस्ट यांना सूचना देण्यात आले. या परिसरात लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षकाची दिवस-रात्र नेमणूक करावी, असे लेखी आदेश दिले आहे. सुरक्षा भिंतीचे काम करण्यात यावे.
-संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक- शिरूर