रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील पारोडी सातकरवाडी नदीकिनारी असलेला 100 केवी ट्रान्सफार्मर ऐन उन्हाळ्यात रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्यांकडून फोडण्यात आला. ट्रान्सफार्मर दुरुस्त करुन आणल्यानंतर हा ट्रान्सफार्मर महिन्यात दोन वेळा जळाला. यावेळी आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून येथे दोनशे केवीचा ट्रान्सफार्मर बसवण्यात आला.
उन्हाळ्यात शेतातील पिकाचे नुकसान होण्याआधी व जनावरांसाठी पाण्याची समस्या उद्भवण्याआधी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातकरवाडी गावचे ग्रामस्थ गणेश गुलाब सातकर यांनी शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी तातडीने ट्रान्सफार्मर उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता आमदार पवार यांनी वेळेचे गांभीर्य लक्षात घेतले.
पवार यांनी पहिल्या ट्रान्सफॉर्मरला लोड जास्त होत आहे. ट्रान्सफार्मर (200) केंवीचा बसवून देण्यात यावा, अशा सूचना महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यानंतर 17 मे रोजी ट्रान्सफार्मर दोनशे केवींचा बसवण्यात आला. शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत आमदार अशोक पवार व महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी गणेश गुलाब सातकर, चंद्रकांत कोकरे, नितीन कोकरे, योगेश सुनिल टेमगिरे, सुखदेव टेमगिरे, धनंजय देशमुख (वायरमन) व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.