पुणे : Uday Samanth News : कोयता गॅंगच्या दहशतीमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवासांपूर्वी एका कोयता गॅंगला पोलिसांनी भर रस्त्यात चांगलेच फोडून काढले होते. त्यानंतर कथित कोयता गॅंगवर पोलिसांना जरब बसविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. मात्र अधून मधून कोयता गॅंग डोकेवर काढून दहशत पसरवित आहे. त्याचाच धागा पकडत उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samanth News) यांनी पोलिसांना एक सूचना देणार असल्याचे सांगितले आहे. (Terrorism, dangerous to democracy, police…knock it out: Industries Minister Uday Samant)
उदय सामंत काय म्हणाले
जितो पुणे (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) च्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री सामंत बोलत होते. ‘आत्ताच्या काळात गांधींजींच्या अहिंसा मार्गावर चालायाला हवे, मात्र, तसे कुठेही पहायला मिळत नाही. मागे मी ऐकले, पुण्यात कोयता गॅंगची मोठी दहशत आहे. कोयता गॅंगला ठोकून काढा” असे मी पोलिसांना जाता-जाता सांगणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच दहशत करणे, लोकशाहीला घातक असल्याचेही ते म्हणाले.
मिलिंद फडे यांना लाईफ टाईम आचिव्हमेंट अवार्ड देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ एस.के. जैन, जितोचे चेअरमन राजेशकुमार सांकला, व्हाईस चेअरमन विजय भंडारी व अन्य उपस्थित होते.
संजय राऊतांना टोला
जैन समाजाच्या चार संघटना एकत्र येऊन चांगले काम करत आहेत. मात्र असे राजकारणात घडत नाही. सकाळी उठून टिव्ही लावला की, शिविगाळ करायचा शो लागतो. असे सांगत सामंतांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊतांना टोला हाणला.