Leopard News : शिरूर : कुठे बिबट्याचे दर्शन… कुठे पाळीव प्राण्यांवर हल्ले…तर कुठे मुक्या जनावंराचा नाहक बळी जाऊन शेती पुरक व्यवसाय धोक्यात आला आहे. यातून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असल्याने घरातून बाहेर पडावे की नाही. अशी स्थिती शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात झाली आहे. वनविभाग कारवाई करून बिबट्याला जेरबंद करत नाही. एका बाजूला पाऊस नाही अन दुसऱ्या बाजूला बिबट्याची दहशत मग आम्ही जगायचे कसे ? असा प्रश्न सध्या कवठे येमाई येथील सर्व सामान्य शेतकरी व ग्रामस्थांमधून येऊ लागला आहे.(Leopard News)
मुक्या जनावंराचा नाहक बळी.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात कवठे येमाई येथे रविवार (ता. ३० ) ला पहाटे चार वाजता विलास विठ्ठल बच्चे यांच्या घरासमोर बांधलेल्या जनावरांतून एक सात महिन्याच्या जर्शी कालवडीवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये हे संकरीत कालवड ठार झाली आहे.(Leopard News)
मागील दहा ते पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून परिसरात अनेक पाळी कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. डोंगराचा काहिसा भाग असल्याने या भागात अनेक वेळा नागरिकांना बिबट्याने दर्शन दिले आहे. पहाटे बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला होता. घरासमोर काहीतरी गडबड होत असल्याचे लक्षात येवून या भीतीमुळे घराबाहेर पडता आले नाही. बिबट्याने कालवडीवर हल्ला करीत तिला ठार केल्याचे व शेजारीच बांधलेल्या दुस-या कालवडीच्या गळ्याला ही बिबट्याने हल्ला केल्याने ती कालवडही जखमी झाली असल्याचे विलास बच्चे यांनी सांगितले.(Leopard News)
दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून पशु वैद्यकिय अधिकारी डॅा. मुन्ने, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी हनुमंत कारकूड हे सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी दाखल झाले होते. शासन नियमानुसार योग्य ती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यास मिळणार असल्याचे शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.(Leopard News)
नागरिकांनी आपल्या पशुधनाचे बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याकामी योग्य ती खबरदारी व उपाययोजना घेण्याचे आवाहन वनपाल गणेश पवार,वनरक्षक नारायण राठोड यांनी केले आहे.(Leopard News)
सध्या या परिसरात पाऊस नाही त्यामुळे खरीपाच्या पेरण्या झाल्या नाहित. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याने बिबट्याच्या दहशतीने या परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाने येथे तात्काळ पिंजरा लावावा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश सांडभोर व ग्रामस्थानी केली आहे.(Leopard News)
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर म्हणाले की, पाऊस नसल्याने पिकाचे उत्पादन देखील कमी झाले आहे. बिबट्याला लपण्यासाठी जागा उपलब्ध नसून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्यासाठी बिबट मानववस्तीकडे वळू लागला आहे. नागरिकांनी वनविभागाच्या सल्ल्याने वाडीवस्तीवर बिबट पासून बचावासाठी उपाय योजना कराव्यात.(Leopard News)
वनविभागाने घटनेचा तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. त्यासाठी कोणताही खर्च घटना घडलेल्या शेतकऱ्यांकडून घेऊ नये. संबधीत शेतकऱ्याला पंचनामा करताना खर्च करावा लागत असेल तर तत्काळ कळवावे. बिबट बंदोबस्तासाठी व पिंजरा मागणीसाठी लवकरच सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्याची बैठक आयोजीत करण्यात येईल. असेही मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले. आहे.(Leopard News)