भोर: डोंगर परिसर असलेल्या भोर तालुक्यात मागील चार दिवसांपासून थंडी वाढली असल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या असून, नागरिकही गरम कपडे घालून घराबाहेर पडू लागल्याचे चित्र दिसत आहे.
तालुक्यात सध्या २३ अंश सेल्सिअस तापमान असून, थंडी मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. थंडीचा उपयोग रब्बीतील पिकांना होणार असला, तरी नागरिक चांगलेच गारठले आहेत. थंडी वाढल्यामुळे नागरिक गारठून गेल्याने शेती कामावर याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला आहे. चिमुकल्यासह वयोवृद्ध थंडीपासून बचावासाठी वर्षभर घरात पडून असलेल्या स्वेटर, कानटोपी, मफलर या उबदार वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहेत. पुढील काळात अजूनही मोठ्या प्रमाणावर गारठा वाढला तर नागरिक त्रस्त होण्याचे चित्र आहे. चार दिवसांपासून दैनंदिन तयार होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे.