पुणे प्राईम न्यूज डेस्क: हायब्रिड मॉडेलवर खेळवल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची उत्सुकता चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची मुदत संपत आल्याने आता सर्व 8 संघ लवकरात लवकर टीम जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता न्यूझीलंड संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीमची घोषणा केली असून मिचेल सँटनर न्यूझीलंडचा कर्णधार असेल. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड
श्रीलंकेविरुद्ध मायदेशात एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी मालिकेत यशस्वी कामगिरी केल्यानंतर आता न्यूझीलंड आत्मविश्वासाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड पहिल्यांदाच आयसीसीची टुर्मानेंट खेळणार असल्याने न्यूझीलंड संघावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
न्यूझीलंडच्या संघात तीन ऑलराऊंडर
विल ओ’रुर्के, बेन सियर्स आणि नॅथन स्मिथ या आक्रमक माऱ्यासह संघ आक्रमक खेळी करेल. केन विल्यमसन आणि टॉम लॅथम या दोन अनुभवी खेळाडूंचं मार्गदर्शन देखील संघाला मिळणार आहे. तसेच मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र हे तीन ऑलराऊंडर कोणत्याही क्षणी सामना पलटवण्याची ताकद ठेवतात. मॅट हेन्री आणि अनुभवी लॉकी फर्ग्युसन कशी कामगिरी करणार? यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.
न्यूझीलंडचे गट फेरीचे सामने
१९ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची.
२४ फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी.
२ मार्च – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई.