Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचा पगार रखडणार; कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय वेतन नाही

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 20 August 2025, 14:27

पुणे : राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याचा पगार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लवकर मिळावा, अशी शिक्षक संघटनांची मागणी असली तरी या पगारावर बंधने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, शिक्षण विभागाने शालार्थ आयडीतील बोगसगिरी शोधण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत सर्व खाजगी अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा त्या कर्मचाऱ्यांचा पगार रोखण्यात येईल, असे स्पष्ट आदेश वेतन अधीक्षकांनी दिले आहेत.

 

सामान्यतः दर महिन्याला शिक्षकांचा पगार भागवण्यासाठी आवश्यक निधी 20 तारखेपूर्वी वितरित केला जातो. मात्र यंदा गणेशोत्सवामुळे हा निधी लवकर देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. माहितीप्रमाणे ऑगस्ट महिन्याचा निधी पुढील दोन ते तीन दिवसांत वितरित केला जाईल. परंतु आवश्यक कागदपत्रे अपलोड न झाल्यास संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पगार थांबवला जाणार आहे.

शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोव्हेंबर 2012 पासूनची कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर टाकण्यात आली आहे. जे मुख्याध्यापक ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले जाणार आहे.

राज्यातील खाजगी अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे 4.75 लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पडताळणी या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांच्या कालावधीत सादर झालेली सर्व कागदपत्रे तपासणार असून, या पडताळणीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई होणार आहे.

यामुळे सध्या शिक्षकांना पगार वेळेवर मिळण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. एका बाजूला गणेशोत्सवामुळे लवकर पगार मिळावा, अशी अपेक्षा आहे; तर दुसऱ्या बाजूला कागदपत्रांच्या पडताळणीमुळे पगार उशिरा मिळण्याची भीती निर्माण झाली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : फुलांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला! शेतकऱ्याच्या गाडीतून दिवसाढवळ्या दोन लाखांची रोकड लंपास

Saturday, 9 May 2026, 17:32

Loni Kalbhor News : कुंजीरवाडीत रस्ता अडवून शिवीगाळ, मुलाच्या बोटाला चावा, दगडफेकीत महिला जखमी

Saturday, 9 May 2026, 17:16
two people detained for taking bribe in parbhnai

Khed Bribe News : वारसनोंदीसाठी ५५०० रुपयांची लाच घेताना तलाठी-कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 9 May 2026, 16:39

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

Saturday, 9 May 2026, 14:57

Sangram Bapu Bhandare : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले ; पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा – संग्राम बापू भंडारे यांचा इशारा..

Saturday, 9 May 2026, 14:14

Theur News : थेऊरफाटा उड्डाणपुलाला 10 फुटांचे भगदाड ; भिंतींनाही तडे, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ; सभापती युवराज काकडे यांच्याकडून तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी..

Saturday, 9 May 2026, 14:08
Next Post

किरकोळ कारणावरून मुलाने केली बापाची हत्या; 'ताटात उष्टं अन्न का ठेवले' म्हणत कुऱ्हाड उचलली अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.