अमोल दरेकर
सणसवाडी (ता. शिरूर) : येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गौतम दशरथ देवकर यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ ३४ वर्षाच्या ज्ञानदानाच्या कार्यातून सेवानिवृत्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी सपत्नीक देवकर यांचा सन्मान करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील किणी या छोट्याशा गावातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर सणसवाडीतील नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले.
सणसवाडीसह परिसरातील अनेक पिढ्या शिक्षणाच्या माध्यमातून घडवण्याचं काम त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत केले. या विद्यालयातील शांत संयमी कडक शिस्तीचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची विद्यार्थ्यांसह गावात ओळख.
या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या सहकार्यसह आजी-माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यकळातील जीवनपट आपल्या भाषणात बोलून दाखवला. जुन्या आठवणीनी या आनंदअश्रूनी वाहत कौतुक सोहळा पार पडला. यावेळी शिक्षक देवकर यांना भावनांचा बांध फुटला न भावनिक झाले. शिक्षक अश्रू पाहून आजी-माजी विद्यार्थी यांचे नयन अश्रू अनावर झाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे, उपाध्यक्ष अण्णासाहेब दरेकर, माजी अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, केंद्रप्रमुख टिळेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, माजी उपसरपंच विजयराज दरेकर, अनिल पलांडे यांच्यासह माजी विद्यार्थी, शाळा समिती सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापकीका राधिका मेंगावडे यांनी, तर आभार काळुराम रणसिंग यांनी मांडले.