बारामती : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भगवान माळी, डॉ. रूपाली चितळे, डॉ. माधुरी पाटील, प्रा. वैशाली माळी यांच्या ‘पॉट फार कूलिंग ऑफ वॉटर’ या पिण्याचे पाणी थंड करण्याच्या संशोधनाला भारत सरकारचे डिझाइन पेटंट प्राप्त झाले. या संशोधनामुळे जनसामान्यांना आरोग्यदायी कमी खर्चात व कमी त्रासामध्ये पिण्याचे थंड पाणी उपलब्ध होऊ शकते. या संशोधनामुळे पारंपरिक पद्धतीने पाणी थंड करण्यासाठीचा पाण्याचा कमी अपव्यय व सतत पाणी मारण्याचे कष्टसुद्धा कमी असणार आहेत. प्रा. डॉ. भगवान माळी व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शहा, सचिव मिलिंद शहा, प्रा. डॉ. अविनाश जगताप यांनी अभिनंदन केले.