Tanaji Sawant | पुणे : रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेटची चौकशीसाठी तीन सदस्यीस समिती नेमली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती ही असणार आहे. समिती तीन महिन्यात अहवाल सादर करणार आहे. अशी घोषणा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केली.
किडनी रॅकेट प्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. या रॅकेट मधील मुख्य आरोपी फरारी आहे. ही संघटित गुन्हेगारी असून, या रॅकेटचे लोन महाराष्ट्रात पसरल्याचे मिसाळ यांनी निदर्शनास आणले.
रुबी हॉल क्लिनिक मध्ये अनियमतात आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार…!
धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत रुग्णालयांमध्ये मोफत किंवा पन्नास टक्के सवलतीच्या दरात गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची अनियमितता तपासण्यासाठी लेखा परीक्षकांच्या मार्फत परीक्षण करून अनियमितता आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली. याबाबत आमदार माधुरी मिसाळ यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला सावंत उत्तर देत होते.
मिसाळ म्हणाल्या, या कल्याणकारी योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नाही.त्यांना वैद्यकीय सेवा पासून वंचित राहावे लागते. काही गरजू नागरिकांना लाभ मिळतो.पण याची अंमलबजावणी काटेकोर व पारदर्शक पद्धतीने होत नाही. अशा रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणी मिसाळ यांनी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा परांडा येथे शुक्रवारी जनता दरबार