अक्षय भोरडे
तळेगाव ढमढेरे : स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेचे प्राध्यापक कुंडलिक कदम यांना वाचनसाखळी समूहातर्फे देण्यात येणारा वाचनयात्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती वाचनसाखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभा लोखंडे यांनी दिली.
समाजामध्ये वाचन साखळी रुजविण्यात मोलाचे योगदान
समाजामध्ये वाचन साखळी रुजविण्यात तसेच अनेकांना पुस्तके वाचनासाठी प्रेरित करण्यामध्ये त्याचे मोलाचे योगदान आहे. प्रा. कुंडलिक कदम यांनी शिदोरी व लग्नाचा बार या कथासंग्रहाचे लेखन केले असून, (Talegaon Dhamdhere News) विविध पुस्तकाचे वाचन व परिक्षण केले आहे.
आजपर्यंत दैनिक सकाळमधील गुदगुल्या, आधारवड त्याचबरोबर धूळपेरणी व गोंदण या दिवाळी अंकामध्ये लेखन केले असून, आजपर्यंत प्रबोधन केंद्र पेरणे यांचा साहित्यिक पुरस्कार, (Talegaon Dhamdhere News) संभाजीराव करंजे उत्कृष्ट ग्रामीण साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूर यांचा मराठी साहित्य सेवेचा पुरस्कार अशा विविध पुरस्काराने कुंडलिक कदम यांना गौरविण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आर.एस.एस.चे माजी प्रभारी मदनदास देवी यांचे निधन; पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त!
Pune News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दुपारी दोन तासांचा ब्लॉक; वाहतुकीत होणार हे बदल!