Talegaon Dhamdhare : तळेगाव ढमढेरे : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील निमगाव फाटा ते रांजणगाव गणपती रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावणार, असे प्रतिपादन भाजपा कामगार युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी केले.
निमगांव म्हाळुंगी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन
निमगांव म्हाळुंगी या ठिकाणी विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जयेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून भैरवनाथ मंदिर येथे ८ लाख रुपये खर्चुन बांधण्यात येत असलेल्या सभामंडपाचे भुमिपूजन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषद सदस्या रेखाताई बांदल, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, भाजपा शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, रोहित खैरे, संदीप आण्णा ढमढेरे, निमगाव म्हाळुंगीच्या सरपंच सविता करपे, उपसरपंच अश्विनी लांडगे यांच्या हस्ते झाले. (Talegaon Dhamdhare) या वेळी शिंदे बोलत होते.
या वेळी ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, उद्योजक विजयबापू करपे, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे, डॉ. सचिन चव्हाण, प्रदीप पवार, तनुजा विधाटे, कविता रणसिंग, ज्योती चव्हाण, माजी सरंपच रावसाहेब चव्हाण, माजी सरपंच अर्जून नवले, माऊली विधाटे, विजय विधाटे, मच्छिंद्र नवले, अशोक करपे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
या उद्घाटनाच्या निमित्ताने रेखाताई बांदल, प्रदीपदादा कंद, जयेशदादा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. रांजणगाव गणपती ते निमगाव फाटा हा प्र जि मा १९ रस्ता काही दिवसांमध्येच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. (Talegaon Dhamdhare या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सविता करपे यांनी केले. तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे यांनी केले. आभार शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष एकनाथ लांडगे यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : सणसवाडीत घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर आगीच्या भक्ष्यस्थानी; जीवितहानी टळली