Tuesday, May 20, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘एसीबी’ची मोठी कारवाई! आधी उपकार्यकारी अभियंता तर आता तलाठी जाळ्यात; लाचेची रक्कमही सारखीच…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 4 March 2024, 21:28
talathi caught by ACB while taking bribe in pune district

पुणे : लाईट पोल दुसरीकडे शिफ्टींगची परवानगी देण्यासाठी ठेकेदाराकरून दोन हजारांची लाच स्वीकारताना महावितरणाच्या उरुळी कांचन (ता.हवेली) उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता.4) रंगेहात पकडले. ही घटना ताजी असतानाच, आता जमिनीच्या क्षेत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना राजगुरुनगरच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. एकाच दिवशी दोन मोठ्या कारवाया झाल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

बबन कारभारी लंघे (वय ४६, तलाठी, राजगुरुनगर तलाठी कार्यालय, ता. खेड, जि. पुणे (वर्ग ३) असे रंगेहात पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या मित्राची पत्नी असे दोघांचे भागीदारीमध्ये एक गुंठा क्षेत्र सामाईकमध्ये खरेदी केले आहे. त्या जमिनीच्या क्षेत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी लोकसेवक बबन लंघे यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजगुरुनगर तलाठी कार्यालयात सापळा रचला होता. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून सात-बारा उताऱ्यावर नोंद करुन, उतारा देण्यासाठी तडजोडीअंती २ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. हीच लाच स्वीकारताना लोकसेवक बबन लंघे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आरोपी लंघे याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असून, पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“माझ्या जेवणाचे हाल होत आहेत, तु पुन्हा माझ्याकडे राहायला ये,” असे म्हणत नवऱ्याने बायकोच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने केले वार; गुन्हा दाखल

Monday, 19 May 2025, 21:36

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी..! पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तारीख जाहीर; ‘असा’ भरा अर्ज…

Monday, 19 May 2025, 20:59

इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील दहावीतील माजी विद्यार्थ्यांची तब्बल 25 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा

Monday, 19 May 2025, 19:54

सोन्याचे दागिने व रोख रकमेसह हरवलेली पर्स येरवडा पोलिसांच्या कार्यतप्तरतेमुळे महिलेला मिळाली परत

Monday, 19 May 2025, 19:51

‘या’ पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस धिंगाणा घालणार; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज

Monday, 19 May 2025, 19:37

घोड धरणात पाणीसाठा 0.80 टक्केच; रांजणगाव एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी…

Monday, 19 May 2025, 18:11
Next Post
PIL admitted in Bombay high court against Maratha reservation

मराठा आरक्षण विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.