Tuesday, May 20, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव घेणं सुरेश धसांना शोभणारं नाही…’; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनावले खडेबोल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 29 December 2024, 9:37

पुणे : बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. सुरेश धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करत अनेक अभिनेत्रींचीही नाव घेतली आहेत. यात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचाही समावेश आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना चांगलेच सुनावले आहेत.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचे चारित्र्य आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमी काळजी घेतली आहे. राजकीय वाद सुरू आहे. यामध्ये सामाजिक आणि संवेदनशीलपणा देखील आहे. या प्रकरणात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे. पार्टीचा आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहे. तुम्ही असं करू नये, असे म्हणत त्यांनी सुरेश धस यांना चांगले खडेबोल सुनावले आहेत.

मात्र, देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाहीत..

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सहा दिवसाच्या अधिवेशनात चार ते साडेचार तासाच्या चर्चेसाठी वेळ दिला. सर्वांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी रिप्लाय दिला, त्यात त्यांनी कोणताही शंका ठेवलेली नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, मी कोणाचाही मुलायजा ठेवणार नाही. त्यानुसार ते पावलं उचलत आहेत. प्रत्येकाने भावना व्यक्त करणे यात काही गैर नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाहीत, असे त्यांनी म्हटले.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ, एका आठवड्यात संख्या १२ वरून ५६ वर

Tuesday, 20 May 2025, 15:25

 सिंहगडावरील पर्यटकांसाठी महत्वाची बातमी..! वनविभागाकडून प्लास्टिक बंदीचा निर्णय; येत्या 1 जूनपासून नवे नियम होणार लागू…

Tuesday, 20 May 2025, 15:15
enquiry of 50 offices of bhumi abhilekh starts from today pune

बिग ब्रेकींग : राज्यातील पन्नास भूमी अभिलेख कार्यालयात तपासणीचा सर्जिकल स्ट्राईक; ‘पुणे प्राईम न्यूज’चा इम्पॅक्ट

Tuesday, 20 May 2025, 15:02

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बीड दौरा; जिल्हा बंदला स्थगिती मंत्री पंकजा मुंडेसह धनंजय मुंडेही लावणार उपस्थिती

Tuesday, 20 May 2025, 14:52

आनंदाने शेतात फेरफटका मारताना बापलेकासोबत घडलं भयंकर, कोल्हापूर येथील खळबळजनक घटना

Tuesday, 20 May 2025, 14:30

थुंकल्यामुळे लोणी काळभोरमध्ये पेटला वाद ; दोन गटात तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी 13 जणांवर गुन्हा तर 4 जणांना अटक

Tuesday, 20 May 2025, 14:11
Next Post

भीषण अपघात! पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी बसला ट्रकची जोरदार धडक; २ जण ठार, अनेकजण गंभीर जखमी..

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.