वाघोली : वाघोली महावितरण शाखेमध्ये प्रशिक्षणार्थी असलेल्या दोन तरुणांना विद्युत शॉक लागून अपघात झाला, त्यात ते दोघे तरुण अंदाजे 30 ते 35 टक्के भाजले आहेत. याप्रकरणी दोषींवर कारवाई करा. अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विद्युत निरीक्षक पुणे, यांच्यासह लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्याकडे केली आहे.
वाघोली महावितरण शाखेमध्ये प्रशिक्षणार्थी असलेल्या दोन तरुणांना विद्युत शॉक लागून अपघात झाला. त्या तरुणांच त्यांचे प्रशिक्षण सुरू असताना त्यांच्याबरोबर अधिकृत वायरमन किंवा अधिकारी न देता त्यांना तलेरा गोडाऊन जवळील स्विच बदलण्यास सांगितला, कोणत्याही प्रकारे विद्युत पुरवठा बंद न करता त्यांना काम करण्यास भाग पाडले. यावेळी काम करत असताना दोन्ही प्रशिक्षणार्थी तरुणांना विजेचा शॉक लागून अपघात झाला. त्यामुळे या अपघातास जबाबदार असणाऱ्या वाघोलीच्या सहाय्यक अभियंत्यावर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विद्युत निरीक्षक पुणे, यांच्यासह लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की या तरुणांच्या जीव वाचला असला तरी हे तरुण अंदाजे 30 ते 35 टक्के भाजले आहेत. संबंधित अधिकाऱ्याकडून बेजबाबदारपणे हलगर्जीपणाने जबरदस्तीने या तरुणांकडून काम करून घेतले. तसेच अपघातानंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सहाय्यक अभियंता दीपक बाबर, वायरमन हनुमंत आव्हाळे, तसेच निखिल खांदवे यांची योग्य ती चौकशी करत यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत सहाय्यक अभियंता दीपक बाबर यांनी सांगितले की त्या दोन्ही तरुणांची तब्येत उत्तम असून त्यांच्यावर व्यवस्थित उपचार करण्यात आले आहे, परंतु जाणून बुजून बदनाम करण्याच्या हेतूने हा प्रकार सुरू आहे.