लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कदमवस्ती जिल्हा परिषद शाळेत स्वदेशी व्याप्ती कार्यक्रम सोमवारी (ता. 2) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
या कार्यक्रमाचे आयोजन एमआयटी विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स (IEEE) मधील कॉम्प्युटेशनल इंटेलिजन्स सोसायटीचे पुणे चॅप्टर मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी केले होते. विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक मूल्ये रुजविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य आणि स्वच्छता जागरुकता, स्वच्छता मोहीम विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी जीवन जागविण्यासाठी यशस्वी ठरेल. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि सामुदायिक कल्याणास प्रोत्साहन मिळेल. तसेच विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्तीला प्रेरणा देण्यासाठी चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली आहे. स्वदेशीचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना शिकण्याच्या मौल्यवान संधी प्रदान करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल, याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स च्या अध्यक्षा डॉ. जयश्री प्रसाद, उपाध्यक्षा डॉ. कल्याणी भोले, सचिव डॉ. ज्योती करंजलकर, डॉ. नितीन मोरे, डॉ. अनुजा जाधव, मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका कामिनी जगधने, नवनाथ पानमंद, नजमा तांबोळी, सीमा साबळे, महेश पवार, सचिन कराड, प्रियांका लामतुरे, सोनाली खंडाळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.