शिरूर: राष्ट्रीय ध्वज असणाऱ्या तिरंग्याचा अवमान करणाऱ्या शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे , मांडवगण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश कदम व इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुणे जिल्हा आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सचिव संतोष शिर्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
शिर्के यांनी लिहलेल्या पात्रात म्हटले आहे की, शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत मांडवगण फराटा पोलीस स्टेशन येत आहे. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 ते 8 वाजेदरम्यान हर घर तिरंगा या केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशातील सर्व घरांवर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकवण्याची आव्हान करण्यात आले, त्याचाच एक भाग म्हणून सर्वत्र तिरंगा रोषणाई करण्यात आली. शिरूर तालुक्यातील शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत मांडवगण फराटा पोलीस स्टेशन येते. 13 ऑगस्ट सकाळी 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान झेंडावंदन केले. मात्र, यावेळी परिसराची कोणतीही स्वच्छता न करता पोलीस कर्मचाऱ्यांनी झेंडावंदन केले, त्यामुळे शासकीय सेवेत काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून एक प्रकारे तिरंग्याचा अवमान झाला आहे.
ज्या ठिकाणी पोलीस कर्मचान्यांनी तिरंगा फडकावला, तिथे गवत आणि गहाण असताना कुठलीही स्वच्छता केली नाही. त्यामुळे तिरंग्याचे पावित्र्य राखले नाही. गडबड करत तिरंगा फडकवून काम उरकले. त्यामुळे शिरूरचे पीआय ज्योतीराम गुंजवटे व मांडवगणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश कदम व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.